सोमवार, ३ एप्रिल, २०१७

                                                              आजी -आजोबा 


हा माझा पहिला ब्लॉग. खूप आधीच ठरवल होत कि जेव्हा लिहिणार तेव्हा पहिले आजी आजोबांवरच लिहिणार . आज अचानक  करतेय . प्रत्येकाचा मनात आजी साठी खास जागा असते . अर्थातच माझीही आहे. लहानपणापासून  मला वाटत माझे पहिले मित्र आणि मैत्रीण हेच दोघे असावेत . आता २७ वर्षानंतर सुद्धा मला तिचा खूप आधार वाटतो. कधीही चांगल्या वाईट प्रसंगी मला तिची पाहिले आठवण येते आणि मी तिला बोलल्याशिवाय आजही राहत नाही. माझ्यासाठी माझे आजी आजोबा सायंटिफिक धार्मिक अध्यात्मिक  up to date मॉडर्न आणि माझे आदर्श  आहेत. कुठल्याही प्रकारचा गप्पा मारू शकते मी तिच्याशी   दोन मैत्रिणी मारतात अगदी तशाच . हि एक छोटीशी कविता लिहायचा केलेला प्रयत्न. 

आजी -आजोबा

भाग्य लाभले आम्हास 
आजी आबांचा सहवास 
काय वर्णू महती त्यांस 
नात्याचा दरवळे सुवास 

अनुभूती घेतली सुगंधाची 
माला गुंफू आठव-फुलांची 
संचित माया आजी आबांची 
जोड त्यास आशीर्वादाची 

आजी तुझा शब्द  धीराचा 
कधी तोच समजुतीचा  
मधेच तो पोक्त अनुभवाचा 
केवळ आणि केवळ प्रेमाचा 

आजोबा तुम्ही भारीच तरुण 
वागता माझ्या रुपात येउन 
नात्याला जीवापाड जपून  
'कठोर' तरी खोबरच आतून 

आजी आबा आता वेळ अशी 
 तुमच्यावरली प्रीत कशी 
तुम्हाला अलगद वदण्यासाठी 
कुपी उघडली कवितेची 

फेडावे कसे तुमचे ऋण ?
रहावे वाटते 'सावली' बनून 
माया प्रेम अन सुप्त गुण 
सायीतही यावे जुळून 


आजहि भेटल्यावर कृष्ण नेमका कसा होता त्याचा वागण्याची प्रत्येक व्यावहारिक बाजू कशी आहे.  रामदासांनी संसाराचा टिप्स कशा सांगितल्या आहेत . आणि तुमचा कर्माचा तुम्हाला मिळणाऱ्या यशाशी कसा संबंध आहे असे कित्येक विषय सहजतेने बोलून आम्हा नातवंडांना जागेवर खिळवून ठेवण्याचं काम माझी आजी करत असते . नेहमी  हसतमुख चेहरा  प्रसन्न  व्यक्तीमत्व  कधीही आळस नाही  असा आम्हा तरुण मुलांनाही जमत नाही . तिने बोलता बोलता सांगितलेल्या गोष्टी आणि मला लिहिलेली पत्रं (आता  पत्रं  नामशेष  झालेली आहेत ) मला आजही मार्गदर्शन करत असतात. 

मला whatsapp वापरायला शिकव . तुझ  biochemistry  पुस्तक मला दाखव एवढाच नाही तर एखादया प्रेम कवितेचं विश्लेषण आणि कुठल्याही नवीन गोष्ट जाणून घ्यायची ओढ़ आजोबाना  ८०व्या वर्षीही  होती. त्यांनी मला केलेले टेक्स्ट message  आजचा घडीला केवळ मलाच नाही तर माझा मित्र मैत्रिणींनाही प्रोत्साहन देऊन जातात . जस एखाद्या साहित्यात लिहितात कि त्यांनी दिलेला ठेवा आजही माझ्याकडे आहे त्याचप्रमाणे त्यांचा आठवणी हीच माझी अमूल्य संपत्ती आहे. असे आणि इतक्या वेळेला प्रयत्न कर कि परमेश्वराला  द्यायला भाग पडेल या त्यांचा शिकवणीमुळे मी आज खंबीरतेने कुठल्याही गोष्टीचा सामना करत आहे. असे आजी आजोबा प्रसंगी कडक आणि प्रसंगी मऊ असल्यामुळे माझे friends बनून नेहमीच माझ्याबरोबर असतात.  

असे त्यांचे LIFE LESSONS सगळ्यांपर्यंत अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत पोहचावे या विचारातून हि सुरुवात. भेटूया परत लवकरच . 



वेदश्री

६ टिप्पण्या:

  1. Faarach Masta Kavita ani blog Vedashree..Mala majhya aaji aajobancha far sahavas labhla nahi..Tyamule sarvach aaji aajoban var majha jeev aahe..Tyancha Aashirwad gheun suruvat kelya baddal Abhinandan..Keep it up.

    उत्तर द्याहटवा